महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबार जिल्ह्यातील धुरखेडा परिसरात आढळला बिबट्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - नागरिक

चार महिन्यांपूर्वी याच परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका अकरा वर्षीय बालकाला आपला जीव गमवावा लागला होता.

शहादा तालुक्यातील धुरखेडा परिसरात आढळला बिबट्या

By

Published : May 2, 2019, 5:00 PM IST

नंदुरबार- शहादा शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंगाणे-धुरखेडा रस्त्यावर जगन्नाथ पाटील (रा. धुरखेडा ता शहादा) यांच्या केळीच्या शेतात गुरुवारी बिबट्या आढळून आला. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने सापळे रचले आहे.

शहादा तालुक्यातील धुरखेडा परिसरात आढळला बिबट्या

चार महिन्यांपूर्वी याच परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका अकरा वर्षीय बालकाला आपला जीव गमवावा लागला होता. तसेच अंबापूर शिवारात बिबट्याने हल्ला करून तीन गावकऱ्यांना जखमी केले होते. त्यामुळे परिसरात बिबट्या वावरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच त्याला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी गावकऱयांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details