महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हॉस्पिटलमध्ये घुसलेल्या बिबट्याचा धुमाकूळ; चार तासानंतर वनविभागानं केलं पिंजऱ्यात बंद - Aditya Hospital Nandurbar

leopard News : नंदुरबार शहरातील आदित्य हॉस्पिटलच्या (Aditya Hospital) इमारतीत अचानक बिबट्या घुसला. चार तासांच्या अथक प्रयत्नाने शहादा वन विभागाला अखेर बिबट्याला पकडण्यात यश आलं.

leopards News
हॉस्पिटलमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 12, 2023, 6:55 PM IST

हॉस्पिटलमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

नंदुरबारleopard News: गेल्या काही दिवसांपासून शहरात बिबट्याचा वावर वाढला ( The leopards range increased ) आहे. शहादा शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आदित्य हॉस्पिटलमध्ये (Aditya Hospital Nandurbar) अचानक बिबट्याने शिरकाव केल्याने, रुग्णालय प्रशासन आणि रुग्णांची धावपळ सुरू झाली. रुग्णालयात सफाई कर्मचारी साफसफाई करताना बिबट्या असल्याचं लक्षात आल्यावर, रुग्णालय प्रशासनाने वनविभागाला पाचारण केलं. मध्यवस्तीत असलेल्या रुग्णालय परिसरात हजारो नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. तर बिबट्याला पिंजरा लावून शहादा वन विभागाने जेरबंद केलं आहे. तर या घटनेमुळे हॉस्पिटल परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

रुग्णालयात बिबट्या घुसल्याने एकच धावपळ : शहादा शहरातील भरवस्तीत बिबट्या शिरल्याने (leopard Entered In Aditya Hospital) एकच धावपळ उडाल्याचं दिसून आलं. शहरातील अतिशय वर्दळीचा परिसर मानल्या जाणाऱ्या डोंगरगाव रोडवरील पटेल रेसिडेन्सीच्या मागे असणाऱ्या आदित्य हॉस्पिटलमध्ये सकाळच्या सुमारास हा बिबट्या (leopard) आढळून आला. हॉस्पिटलच्या मागच्या पोर्चमध्ये बिबट्याला अडकवून ठेवण्यात प्रशासनाला यश आलं. यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने देखील तत्परता दाखवत हॉस्पिटलमधली बाकीची प्रवेशद्वारं बंद करुन बिबट्याला एकाच रुममध्ये रोखलं. त्यामुळं रुग्णालयातील रुग्णांना आणि नातेवाईकांना बाहेर काढण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आलं.



वन अधिकारी घटनास्थळी दाखल : आदित्य रुग्णालयात बिबट्या असल्याची माहिती शहादा वन विभागाच्या (Shahada van vibhag) अधिकाऱ्यांना मिळाली. वन विभागाचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मध्यवस्तीत असलेल्या रुग्णालयात बिबट्या घुसल्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. नागरिकांचा आवाज ऐकून बिबट्या धुमाकूळ घालत असल्यामुळं वनविभागाच्या अधिकाऱ्यांना शर्तीचे प्रयत्न करावे लागले.

हेही वाचा -

  1. नाशिक जिल्हा बिबट्यांचा 'हॉटस्पॉट'; एक बिबट्या एसीची हवा खात बसला बेडरूच्या कपाटावर
  2. Leopard In Nashik : नाशिक जिल्ह्यात 80 टक्के शुगर कॅन लेपर्ड; 'हे' आहेत तालुके बिबट्याचे हॉटस्पॉट
  3. Two leopards Death: विजेची तार अंगावर पडल्याने दोन मादी बिबट्यांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details