नंदुरबार - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर ( Praveen Darekar on tour of Nandurbar ) आले होते. त्यांनी जिल्ह्यातील शहादा व नंदुरबार सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनास ( ST Worker Agitation ) भेट दिली. यावेळी त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला. राज्य सरकारने विलीनीकरणाच्या मुद्द्यावर एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेशी समन्वय साधून बैठक लावावी व यातून मार्ग काढावा. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचे शांततेत चाललेले आंदोलनास दडपशाही पणा करू नये असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. ( Praveen Darekar on ST Worker Strike )
राज्य सरकारवर टीका -
राज्यात एसटीची होत असलेली तोडफोड सरकार पुरस्कृत हिंसाचार आहे का हे तपासण्याची गरज राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार आणि शहादा बस स्थानकातील ( Shahada bus stand ) आंदोलक कर्मचाऱ्यांची भेट घेतली. सरकारची पगारवाढ आभासी असून कर्मचाऱ्यांनी किती लाभ होतो याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे.