महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 24, 2019, 10:15 AM IST

ETV Bharat / state

तोरणमाळचे सौंदर्य फुलले, मात्र पर्यटकांच्या सुविधांचा अभाव

नंदुरबारच्या तोरणमाळचे सौंदर्य फुलले आहे. मात्र, याठीकाण पर्यटकांसाठी सुविधांचा अभाव असल्याचे पर्यटक सांगतात.

नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ

नंदुरबार - राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून तोरणमाळची ओळख आहे. तोरणमाळला निसर्ग संपदा भरभरून मिळाली आहे. मात्र, येथे स्थानीक नागरीकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पर्यटकांसाठी अनेक सुविधांचा आभाव आहे. सरकार या पर्यटन स्थळाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरीक करत आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ

सातपुड्याच्या हिरव्यागार डोंगररांगांमध्ये वसलेलं तोरणमाळला निसर्गाने भरभरून दिलेलो निसर्ग सौंदर्य हिरवेगार डोंगर रांगा खळखळुन होणारे धबधबे हे तोरणमाळचे वैशिष्ट्य आहे. यावर्षी तोरणमाळच्या डोंगररांगांमध्ये सर्वा धबधबे सुरू झाले आहेत. मात्र, त्यात पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू सीताखाईचा धबधबा ठरला आहे.

वर्षा पर्यटनासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात तोरणमाळला येत असतात मात्र याठिकाणी पर्यटकांना राहण्यासाठी सुविधा नाहीत तसेच या ठिकाणी दळणवळणच्या सुविधा कमी असल्याचे पर्यटक सांगतात. तोरणमाळचे वैशिष्ट्य असलेला कमल तलाव यावर्षी अतिवृष्टीने फुटला आहे. त्याकडेही प्रशासनाचे लक्ष नाही. यातून गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत असतो. मात्र, आमच्या या पर्यटन स्थळाकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय.

पावसाळ्यात तोरण माळ या ठिकाणचं नैसर्गिक सौंदर्य अधिकच खुलून दिसतं हिरवीगार वनराई कडकडून खळखळून वाहणारे धबधबे याशिवाय यशवंत तलावातील नौकाविहार अनेक नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल तर आपल्याला तोरणमाळला नक्कीच भेट द्यावी लागेल.

ABOUT THE AUTHOR

...view details