नंदुरबार -जिल्हा गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात असल्याने जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात संक्रांतीच्या दिवशी पतंग महोत्सव साजरा केला जातो. सकाळपासूनच नंदुरबार शहरात मोठ्या प्रमाणात पतंग महोत्सवाची धूम पाहण्यास मिळत आहे. घराच्या गच्चीवर उंच इमारतींवर डीजे लावून पतंग महोत्सव साजरा केला जातो. विविध रंगाच्या आणि आकाराचे पतंग आकाशात दिसून येत आहेत. आकाशात पतंगांची जुगलबंदी दिसून येत असून "काट रे" चा आवाज पतंग काट झाल्यावर दिला जातो. पतंगांच्या घातक मांजामुळे अनेक पक्षी जायबंदी होत असतात त्यामुळे त्याचीही काळजी घेतली गेली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एकूणच आज दिवसभर नंदुरबार शहरात पतंग महोत्सवाची धूम पाहण्यास मिळणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यात पतंग उत्सवाचा ज्वर - News about Chinese thread
नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पतंग महोत्सव साजरा केला जातो आहे. या पतंग महोत्सावची धूम सपूर्ण दिवस नंदुरबार शहरात पाहायला मिळणार आहे.
नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात वसलेला आहे. गुजरात राज्याप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात मकर संक्रांतीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पतंग महोत्सव साजरा केला जातो. सकाळपासूनच नंदुरबार शहरात मोठ्या प्रमाणात पतंग महोत्सवाची धूम पाहण्यास मिळत आहे. घराच्या गच्चीवर उंच इमारतींवर डीजे लावून पतंग महोत्सव साजरा केला जातो. विविध रंगाच्या आणि आकाराचा पतंग आकाशात दिसून येत आहेत. आकाशात पतंगांची जुगलबंदी दिसून येत आहे. पतंग महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरातील बाजारपेठा पतंगांनी सजल्या असून रंगीबेरंगी पतंग पतंग शौकिनांना आकर्षून घेतली आहेत. त्याचप्रमाणे प्रशासनाने चायनीज मांजा विक्री करणाऱ्यांवर कडवी नजर ठेवली आहे. गेल्या दोन दिवसात सात ते आठ चायनीज मांजा विकणाऱ्यांवर नंदुरबार शहर व जिल्ह्यात करण्यात आली आहे. जिल्ह्यात मकर संक्रांतीच्या काळात मांजामुळे कुठलीही दुर्घटना घडू नये म्हणून ही कारवाई करण्यात येत आहे.
विविध संघटनांनी बर्ड कॅम्प देखील आयोजित केले आहे. पतंग उडविताना मांजाने पक्षी जखमी होतात व त्यांच्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असतो. त्यामुळे जखमी पक्षींचा योग्यवेळी उपचार करून त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी काही संघटना पुढे आल्या आहेत व त्यांनी त्याबाबत प्रसार व प्रचार देखील केला आहे.