नंदुरबार- गुजरातच्या सीमावर्ती भागात असल्याने जिल्ह्यातही मकरसंक्रांतीला मोठ्या पतंग महोत्सवाचे आयोजन होते. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठा पतंगांनी सजल्या असून रंगीबेरंगी पतंग लहान मुलांना आणि हौशींना आकर्षून घेत आहेत. यामध्ये विविध प्रकारचा मांजाही उपलब्ध आहे.
मकरसंक्रांती निमित्त बाजारपेठा सज्ज; ग्राहकांची गर्दी - kite markets in nandurbar
मकर संक्रांती आणि पतंग महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठा पतंगांनी सजल्या असून रंगीबेरंगी पतंग लहान मुलांना आणि हौशींना आकर्षून घेत आहेत. यामध्ये विविध प्रकारचा मांजाही उपलब्ध आहे.
मकरसंक्रांती निमित्त बाजारपेठा सज्ज; ग्राहकांची गर्दी
यावर्षी बाजारपेठेत पब्जी कार्टून तसेच पंतप्रधान मोदींच्या छायाचित्रासोबत असलेले पतंग ट्रेंडींगमध्ये आहेत. तसेच 'भारत माता की जय' घोषणा लिहिलेल्या पतंगांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
सध्या प्रशासनाने चायना मांजाच्या विक्रीला बंदी घातली आहे. एकूणच जिल्ह्यात पतंग महोत्सवाचा जोर वाढला असून बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे.