महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालकमंत्री के.सी.पाडवी यांच्या हस्ते 'सिटी स्कॅन सेंटर'चे उद्घाटन - Nandurbar latest news

नंदुरबार जिल्हा रुग्णालयात गेल्या 2 वर्षांपासून सिटी स्कॅन मशिन नसल्याने उपचार करताना अनेक अडचणी येत होत्या.

Kc Padavi inaugurates City Scan Center
पालकमंत्री के.सी.पाडवी

By

Published : Jan 27, 2020, 10:34 AM IST

नंदुरबार- जिल्हा रुग्णालयातील 'सिटी स्कॅन सेंटर'चे पालकमंत्री के. सी. पाडवी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. दुर्गम आणि आदिवासी जिल्हा असल्याने याठिकाणी रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्या. तसेच रुग्णांवर योग्य ते उपचार करता यावे यासाठी राज्य सरकारने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात अद्यावत सिटी स्कॅन कक्षाची निर्मिती केली आहे.

पालकमंत्री के. सी. पाडवी यांच्या हस्ते 'सिटी स्कॅन सेंटर'चे उद्घाटन

नंदुरबार जिल्हा रुग्णालयात गेल्या 2 वर्षांपासून सिटी स्कॅन मशिन नसल्याने उपचार करताना अनेक अडचणी येत होत्या. याची दखल घेत राज्य सरकारने याठिकाणी आधुनिक ट्रॉमा सेंटर सुरू करण्याचे घोषित केले होते. त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रविवारी त्याचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा वळवी, उपाध्यक्ष राम रघुवंशी, खासदार डॉ. हिना गावित आदी मान्यवर उपस्थित होते. सिटी स्कॅन सेंटर कार्यान्वित झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details