नंदुरबार - खान्देशची कुलदैवत मानल्या जाणाऱया कानबाई मातेच्या सण मोठ्या उत्साहाने शहरात साजरा करण्यात आला. खान्देशसह नंदुरबार जिल्ह्यात श्रावणातील पहिल्या रविवारी मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येतो.
खान्देशात कुलदैवत कानबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा
खान्देशची कुलदैवत मानल्या जाणाऱया कानबाई मातेच्या सण मोठ्या उत्साहाने नंदुरबार शहरात साजरा करण्यात आला.
खान्देशात कुलदैवत कानबाई मातेचा उत्सव साजरा
खान्देशची कुलदैवत मानली गेलेली कानबाई मातेचे श्रावणातील पहिल्या रविवारी थाटात आगमन झाले. दीड दिवस कानबाईची स्थापना केली जाते. यानंतर पूजा, आरती करून नैवेद्य दाखवण्यात येतो. सोमवारी सकाळी शहरातून कानबाई मातेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर ढोल-ताशाच्या आवाजात नाचत भाविकांनी धमाल करत मोठ्या उत्साहाने मिरवणूक काढली. मोठ्यांसह चिमुकल्यांचाही मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभाग होता.
Last Updated : Aug 6, 2019, 2:26 PM IST