नंदूरबार- नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या बुराई सिंचन प्रकल्पाची पाहणी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केली. नंदूरबार जिल्ह्यातील तापी काठावरील जून मोहिदा या गावी येऊन त्यांनी ही पाहणी केली. जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी संजीवनी ठरू पाहणारा हा प्रकल्प मागील १५ वर्षापासून अपूर्ण स्थितीत आहे.
पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या दुष्काळी दौऱ्यात तापी बुराई प्रकल्पाच्या कामाची पाहणी - मुख्यमंत्री
नंदूरबार जिल्ह्यातील तापी काठावरील जून मोहिदा या गावी येऊन जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी बुराई सिंचन प्रकल्पाची पाहणी केली. मागील पाच वर्षात आमच्या सरकारने या प्रकल्पाला चालना दिली असून या प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
हा प्रकल्प पूर्ण झाला तर याचा फायदा नंदूरबार जिल्ह्यातील नंदूरबार तालुका आणि धुळे जिल्ह्यातील साक्री आणि शिंदखेडा या तालुक्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पाला मंजुरी भेटली. मात्र, राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नव्हता, अशी खंत रावल यांनी व्यक्त केली. मागील पाच वर्षात आमच्या सरकारने या प्रकल्पाला चालना दिली असून या प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहितीही रावल यांनी यावेळी दिली.
एकूणच मागील १५ वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या भागाला या सिंचन योजनेमुळे बाराही महिने पाणी मिळणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ही योजना कशी लवकरात लवकर पूर्ण करता येईल, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना पालकमंत्री रावळ यांनी केली. या प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर त्याचठिकाणी रावळ यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. दुष्काळी परिस्थितीसाठी ही योजना महत्वपूर्ण असल्याने स्वतः पालकमंत्री आणि मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत. दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी त्यांनी यावेळी रावळ यांनी दिली.