नंदुरबार - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची शनिमांडळ येथे उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
'फडणवीस सरकारने राज्याच्या डोक्यावर ७ लाख कोटींचे कर्ज ठेवले' - jayant patil speaks on economy
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची शनिमांडळ येथे उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
देवेंद्र फडणवीस सरकारने राज्य सरकारवर जवळपास 7 लाख कोटींचा कर्जाचा डोंगर उभा केला आहे. आघाडी सरकारच्या काळातील दोन लाख कोटी वजा करता उर्वरित पाच लाख कोटी गेले कुठे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांनी जिल्ह्यातील मंदाणे आणि शनिमांडळ येथे राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. यावेळी नंदुरबार तालुक्यातील तापी-बुराई या बारगळलेल्या योजनेचा पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. यावेळी त्यांच्यासोबत उमेश पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सभेत भाषण केले.