महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोलीत सेवा बजाविणार्‍या जवानाचा हृदयविकाराने मृत्यू; मोग्राणी गावावर शोककळा - mograni village jawan

गडचिरोेली येथे सेवा बजावणार्‍या नवापूर तालुक्यातील नावली मोग्राणी येथील एसआरपीएफ जवानाचा मंगळवारी हृदयविकाराने मृत्यू झाला

jawan died
जवानाचा हृदयविकाराने मृत्यू

By

Published : Dec 30, 2020, 11:32 AM IST

नंदुरबार- गडचिरोेली येथे सेवा बजावणार्‍या नवापूर तालुक्यातील नावली मोग्राणी येथील एसआरपीएफ जवानाचा मंगळवारी हृदयविकाराने मृत्यू झाला. दिपक लक्ष्मण गायकवाड (३२) असे त्या जवानाचे नाव आहे. आज(बुधवारी) सकाळी दिपक गायकवाड यांचे पार्थिव मोग्राणी गावात दाखल झाले. त्यांच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

हृदयविकाराच्या झटक्याने निधन

जवानाचा हृदयविकाराने मृत्यू
दिपक गायकवाड हे एसआरपीएफ मध्ये सन 2014 साली भरती झाले होते. मंगळवारी सकाळी गडचिरोली येथे सेवा बजावत असताना जवान दिपक यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, डाॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


गावात शोककळा पसरली

दिपक गायकवाड यांचा मृत्यू झाल्याची वार्ता आज सकाळी 10 वाजता पोहोचली. त्यानंतर गायकवाड यांच्या परिवारासह गावावर शोककळा पसरली. गायकवाड यांच्या पश्‍चात आई, वडील, लहान भाऊ, बहिण असा परिवार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details