नंदुरबार- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'जनता कर्फ्यू' पाळण्याचे देशवासीयांसमोर आवाहन केले होते. या आवाहनाला आज नंदुरबारकरांनी शंभरटक्के प्रतिसाद देत बंद पाळला आहे. नेहमीच वर्दळ असणारे शहरातील रस्ते, चौक निर्मनुष्य दिसून आले आहेत.
'जनता कर्फ्यू'ला नंदुरबारामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; पाहा ड्रोनद्वारे टीपलेले शहराचे दृश्य - corona nandurbar
जिल्ह्यातील सर्व प्रकारची कार्यालये व बाजार बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिले होते. याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून बंद पाळला आहे. शहरात लोकांनी गर्दी करण्याचे टाळले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केल्यानंतर हा उपक्रम सुयोग्यरित्या पार पडावा याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घेतली होती. जिल्ह्यातील सर्व प्रकारची कार्यालये व बाजार बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिले होते. याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून बंद पाळला आहे. शहरात लोकांनी गर्दी करण्याचे टाळले आहे.
हेही वाचा-कोरोना इफेक्ट: नंदुरबारमधील अतिदुर्गम भागात आदिवासी भाषेतील गाण्याद्वारे जनजागृती