नंदुरबार - भारतीय जनता पार्टी जोपर्यंत सत्तेत आहे, तो पर्यंत आदिवासींच्या आरक्षणाला हात लावला जाणार नसल्याचे मत भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केले. शहादा विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार राजेश पाडवी यांच्या प्रचारासाठी तळोदा येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
आदिवासींच्या आरक्षणाला हात लावला जाणार नाही - जे. पी. नड्डा हेही वाचा -नंदुरबारमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; लाखोंचा विदेशी मद्यसाठा जप्त
यावेळी नड्डा म्हणाले की, भाजप जो पर्यंत सत्तेत आहे, तो पर्यंत आदिवासींच्या आरक्षणाला हात लावला जाणार नाही. मात्र, आदिवासी समाजात विरोधीपक्ष गैरसमज पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्राला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर देवेंद्र फडणवीस सरकारचे हात मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले. कलम 370 रद्द करून जम्मू काश्मीरमधील आदिवासी बांधवांना भाजपने न्याय दिल्याचे वक्तव्य त्यांनी केले.
हेही वाचा -नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघासाठी 36 उमेदवारांचे अर्ज वैध