महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Income Tax Raid in Nandurbar : नंदुरबारमध्ये आयकर विभागाचे व्यावसायिकांच्या निवासस्थानी व दुकानांवर छापे.. बडे उद्योजक हादरले - Income Tax Raid in Nandurbar

राज्यात आयकर विभागाच्या धाडीचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाले आहे. नंदुरबार शहरातील बांधकाम (Income Tax Raid in Nandurbar) व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक यांच्यावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. आज सकाळी जवळपास नऊ ते दहा ठिकाणी आयकर विभागाकडून व्यावसायिकांच्या निवासस्थानी आणि व्यापारी प्रतिष्ठानाची झाडाझडती घेतली जात आहे. पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या या कारवाईसाठी अन्य जिल्ह्यातूनही पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलावण्यात आली आहे.

Income Tax Raid
Income Tax Raid

By

Published : Dec 22, 2021, 4:22 PM IST

Updated : Dec 22, 2021, 4:33 PM IST

नंदुरबार -नंदुरबार शहरातील बांधकाम व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक यांच्यावर आयकर विभागाने (Income Tax Raid in Nandurbar) छापेमारी केली आहे. आज सकाळी जवळपास नऊ ते दहा ठिकाणी आयकर विभागाकडून व्यावसायिकांच्या निवासस्थानी आणि व्यापारी प्रतिष्ठानाची झाडाझडती घेतली जात आहे. नाशिक आणि औरंगाबाद येथील आयकर विभागाच्या पथकांकडून ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. मात्र आयकर विभागाकडून याबाबत अधिकृतरित्या कुणीही बोललेले नाही. (Income tax department raids businessmens shops) पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या या कारवाईसाठी पोलीसांची कुमकही बाहेरील जिल्ह्यातून बोलावण्यात आली आहे.

नंदुरबारमध्ये आयकर विभागाचे व्यावसायिकाच्या घरांवर छापे

शहरात बड्या व्यावसायिकांकडे आयकर विभागाचा छापा -

नंदुरबार शहरातील बडे व्यापारी व अक्कलकुवा येथील एका व्यक्ती व त्यांच्या आस्थापनांमध्ये नाशिक आणि औरंगाबाद येथील आयकर विभागाच्या पथकांच्या धाडी टाकल्याची (Income tax department raids businessmens shops) प्राथमिक माहिती मिळाली आहे. सकाळपासून आतापर्यंत पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. अद्याप त्याला पुष्टी मिळालेली नाही. नंदुरबार शहरातील ९ नामांकित व्यक्तींकडे व त्यांच्या आस्थापनांमध्ये तपासणी सुरू असल्याचे आढळून आले. नाशिक आणि औरंगाबाद येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक अशा तऱ्हेने धडकलेले पाहून अनेकांचे धाबे दणाणले. आयकर विभागाच्या धाडीमुळे पसरलेल्या या वार्तेमुळे शहरातील बडे व्यावसायिक चांगलेच हादरले आहेत.

नंदुरबारात आयकर पथकांनी अचानक धाड टाकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अर्थात हे पथक केंद्रातील आहे की, राज्य स्तरावरील आहे याची स्पष्टता अधिकृतपणे झालेली नाही. परंतु कागदपत्रांची नोंदींची व दप्तराची झाडाझडती घेतली जात असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. नंदूरबार शहरातील प्रसिद्ध असलेल्या एका व्यावसायिकाची व त्याच्या व्यवसायाशी संबंधित अशा ८ जणांकडे तपासणी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. नंदूरबारसह अक्कलकुवा येथेही एका व्यापाऱ्यांकडे कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. धाडीमुळे नंदुरबार चांगलेच हादरले आहे. वेगवेगळ्या पथकांनी अचानक नंदुरबार शहरातील काही व्यापाऱ्यांकडे छापेमारी करून झाडाझडती घेणे सुरू केले आहे. तथापि पथकांविषयीची अधिकृत माहिती कोणत्याही स्तरावरून देण्यात आलेली नाही.

Last Updated : Dec 22, 2021, 4:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details