नंदुरबार -राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते आज (गुरूवार) नंदुरबार जिल्हा नियोजन भवनाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
नंदुरबार जिल्हा नियोजनभवनाच्या कामाचा शुभारंभ - maharashtra goverment
पालकमंत्री जयकुमार रावल यांनी विधीवत पूजा करुन टिकाव मारत बांधकामाचा शुभारंभ केला. नंदुरबार जिल्ह्याचे नियोजनभवन सर्वांगीन लोककल्याणासाठी बांधण्यात येत असल्याचे यावेळी मंत्री रावल यांनी सांगितले.
नंदुरबार जिल्हा नियोजनभवनाच्या कामाचा शुभारंभ
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हा नियोजनभवन उभे केले जात आहे. पालकमंत्री जयकुमार रावल यांनी विधीवत पूजा करुन टिकाव मारत बांधकामाचा शुभारंभ केला. नंदुरबार जिल्ह्याचे नियोजनभवन सर्वांगीण लोककल्याणासाठी बांधण्यात येत असल्याचे यावेळी मंत्री रावल यांनी सांगितले. प्रसंगी आमदार विजयकुमार गावित, जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.