महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 2, 2021, 3:22 PM IST

ETV Bharat / state

नंदुरबार जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’ यशस्वी

जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी कोरोना लस देण्याचा 'ड्राय रन' सुरू झालेला आहे. सकाळी नऊ वाजून दहा मिनिटादरम्यान जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी ड्रायरनला सुरुवात झालेली आहे.

Corona Vaccine Nandurbar
नंदुरबार जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’ यशस्वी

नंदुरबार - जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी कोरोना लस देण्याचा 'ड्राय रन' सुरू झालेला आहे. सकाळी नऊ वाजून दहा मिनिटादरम्यान जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी ड्राय रनला सुरुवात झालेली आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालय, आष्टे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नागपूर येथील उप जिल्हा रुग्णालयामध्ये हा ड्राय रन सुरू झाला असून, या ठिकाणी जे आरोग्य सेवक आहेत, ज्यांचे रजिस्ट्रेशन आधी झालेला होते, त्यांना या ड्राय रनमध्ये लस देण्यासाठी समाविष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये या ड्राय रनबाबत काहीशी भीती दिसून आली.

माहिती देताना आरोग्य कर्मचारी आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड

हेही वाचा -नंदुरबार जिल्ह्यात होणार कोरोना लसची ड्राय रन

नंदुरबारात ड्राय रनमध्ये पहिली लस घेण्याचा मान रेशमा चाफेटकर या महिला आरोग्य कर्मचाऱ्याला मिळाला. हा ड्राय रन सुरळीत पार पडावा यासाठी जिल्हा यंत्रणेने पूर्ण तयारी केलेली दिसून आली. विशेष म्हणजे, एका व्यक्तीला लस घेण्यासाठी चार ते पाच मिनिटाचा वेळ लागेला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’ यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. जिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत या सराव चाचणीचा सकाळी 9 वाजता शुभारंभ करण्यात आला. ड्राय रनच्या माध्यमातून लसीकरणात येणाऱ्या अडचणी लक्षात येतील आणि त्यानुसार पुढील नियोजन करण्यात येईल. या सराव चाचणीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये विश्वासाची भावना निर्माण होईल. दुर्गम भागातील नागरिकांच्या लसीकरणासाठी देखील प्रशासनाने नियोजन पूर्ण केले आहे. या भागात सीएसआर निधीतून आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. त्यामुळे, प्रत्यक्षात लसीकरणाच्यावेळी समस्या येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आष्टे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी आष्टे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील सराव चाचणीची पाहणी केली. राज्यात नंदुरबारसह पुणे, नागपूर आणि जालना या चारच जिल्ह्यांची ड्राय रनसाठी ‍निवड करण्यात आली होती. जिल्ह्यातील तिन्ही ठिकाणी आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे सर्व तयारी करण्यात आली. वीज, इंटरनेट, सुरक्षेसोबत प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्षाच्या तयारीचे अवलोकन यावेळी करण्यात आले.

असे झाले ‘ड्राय रन’

जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालय अशा तीन ठिकाणी ही सराव चाचणी घेण्यात आली. प्रत्येक केंद्रावर 25 कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी सहभागी करून घेण्यात आले. प्रत्यक्ष लसीकरण मात्र करण्यात आले नाही. 74 कर्मचारी ड्राय रनसाठी उपस्थित होते. लसीकरणासाठी पाच कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले होते. प्रत्येक ठिकाणी प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी वेगळा मार्ग होता. कर्मचारी लसीकरणासाठी आल्यानंतर प्रतिक्षा कक्षात त्याला सॅनिटायझरचा वापर करण्यास सांगण्यात आले. क्रमानुसार कर्मचाऱ्यांना नोंदणी कक्षात नेण्यात आले, त्याठिकाणी ‘कोव्हिन’ अ‌ॅपवर त्यांची नोंद आणि त्यांचेकडील ओळखपत्र तपासण्यात आले. लसीकरणासाठी तोच कर्मचारी आला असल्याची खात्री झाल्यानंतर लसीकरण कक्षात लसीकरणाचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

लसीकरणानंतर घ्यावयाच्या दक्षतेबाबतही सूचना देण्यात आल्या. लसीकरणानंतर प्रत्येक कर्मचाऱ्यास 30 मिनीटे निरीक्षणाखाली वेगळ्या कक्षात ठेवण्याचे देखील प्रात्यक्षिक यावेळी घेण्यात आले. या कक्षात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

हेही वाचा -महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागात भूकंपाचे सौम्य धक्के

ABOUT THE AUTHOR

...view details