नंदुरबार- येथील वनविभागाने अवैध लाकूड तोडीच्या कारखान्यावर छापा टाकला. यात सुमारे चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवापुरात अवैध लाकूड व्यवसायावर छापे; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - अवैध लाकूड व्यवसाय नंदुरबार बातमी
नवापूर तालुक्यातील अवैधरित्या लाकूडी वस्तू बनवण्याचा व्यवसाय वाढला आहे. त्यामुळे वनविभागाचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, वनक्षेत्रपाल प्रथमे हाडपे यांनी कारवाई केली आहे.
हेही वाचा-सरन्याधीशांचा आज कामकाजाचा शेवटचा दिवस, १७ नोव्हेंबरला होणार निवृत्त
नवापूर वनक्षेत्रातील मौजे वडकळंबी व भामरमाळ येथील शेगा रेशमा गावीत (रा. वडकळंबी) व यशंवत गोमा गावीत (रा. भामरमाळ) या दोघांच्या घराची झडती घेतली. दोन्ही ठिकाणी रंधा मशिन, ताजा तोडीचा साग, सिसम, आड जात चोपट, दरवाजा शटर, फर्निचर बनविण्याचे यंत्र सामुग्री जप्त केली आहे. ही सामुग्री खासगी व शासकीय वाहनाने नवापूर येथील शासकीय वन आगारात जमा करण्यात आली.
वनक्षेत्रपाल नवापूर प्रादेशिक यांनी आरोपीविरुध्द गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास सुरू आहे. या कार्यवाहीमुळे नवापूर तालुक्यातील अवैधरित्या लाकूड व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे, वनक्षेत्रपाल प्रथमे हाडपे यांनी केली आहे.