महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये अवैध मद्यसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई - अवैध मद्यसाठा

राज्यात बंदी असलेला मद्यसाठा नंदुरबारमार्गे दमण येथे नेला जात असल्याची माहिती नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने रात्रीच्या वेळी नंदुरबार-नवापूर रस्त्यावरील खामगाव शिवारात सापळा रचला. यावेळी पॅकबंद कंटेनरची तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात विदेशी मद्यसाठा आढळून आला.

Illegal Liquor
नंदुरबारमध्ये अवैध मद्यसाठा जप्त

By

Published : Feb 28, 2020, 10:48 AM IST

Updated : Feb 28, 2020, 1:09 PM IST

नंदुरबार -राज्यातून अवैध मद्यसाठ्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनरसह 13 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नंदुरबार-नवापूर रस्त्यावरील खामगाव शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. हा मद्यसाठा दमण येथे नेला जात होता. जप्त केलेल्या मद्याची किंमत 3 लाख 75 हजार रुपये आहे.

नंदुरबारमध्ये अवैध मद्यसाठा जप्त

राज्यात बंदी असलेला मद्यसाठा नंदुरबारमार्गे दमन येथे नेला जात असल्याची माहिती नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने रात्रीच्या वेळी नंदुरबार-नवापूर रस्त्यावरील खामगाव शिवारात सापळा रचला. यावेळी पॅकबंद कंटेनरची तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात विदेशी मद्यसाठा आढळून आला.

हेही वाचा -व्होडाफोन आयडियाने सरकारकडे केली 'ही' चक्रावून टाकणारी मागणी

या प्रकरणी पुष्पेंद्रसिंह प्रभुसिंह चौहान (रा.काच्बली राजस्थान) याला अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे नाशिक विभागीय आयुक्त अर्जुन ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबारचे अधिक्षक युवराज राठोड, निरीक्षक संजय परदेशी, निरीक्षक शैलेंद्र मराठे, भूषण चौधरी, हितेश जेठे, संदिप वाघ, धनराज पाटील, मानसिंग पाडवी, हंसराज चौधरी यांच्या पथकाने केली.

Last Updated : Feb 28, 2020, 1:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details