महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळे-सुरत महामार्गावर 7 लाखांचा अवैध गुटख्यासह मुद्देमाल जप्त - gutkha seized news

धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गाने सुरतहून मालेगावला अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने नवापूर शहरालगत धुळे-सुरत महामार्गावरील रिलायंस पेट्रोल पंपाजवळ सापळा रचला. यामध्ये एकूण सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

illegal tobacco found in nandurbar
धुळे-सुरत महामार्गावर 7 लाखांचा अवैध गुटख्यासह मुद्देमाल जप्त

By

Published : Oct 1, 2020, 12:52 PM IST

नंदुरबार - ट्रकमधून अवैधरित्या वाहतूक करण्यात येणारा पानमसाला आणि गुटखा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जप्त केला आहे. नवापूर शहरालगत धुळे-सुरत महामार्गादरम्यान संबंधित कारवाई करण्यात आली असून गुटख्यासह सुमारे सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

धुळे-सुरत महामार्गावर 7 लाखांचा अवैध गुटख्यासह मुद्देमाल जप्त

धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गाने सुरतहून मालेगावला अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने नवापूर शहरालगत धुळे-सुरत महामार्गावरील रिलायंस पेट्रोल पंपाजवळ सापळा रचला. सुरतहून मालेगावकडे जाणाऱ्या ट्रकवर पोलिसांना संशय आला. पथकाने तत्काळ ट्रक थांबवून चाचपणी केली. ट्रकमध्ये एक लाख ४० हजारांचा गुटखा व त्यामध्ये १५० ट्रॅव्हल बॅग, बंडलचे खोके, प्लाटीक कचरापन्नी असा एकूण तीन लाखांचा मुद्देमाल आढळला. याचसोबत पोलिसांनी चार लाख किंमतीचा ट्रक असा एकूण 7 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले हवलदार महेंद्र नगराळे, शांतीलाल पाटील, जितेंद्र तोरवणे यांच्या पथकाने संबंधित कारवाई केली आहे. ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अवैधरित्या गुटख्याची तस्करी करणाऱ्या मालकाचा शोध अद्याप सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details