नंदुरबार - अक्कलकुवा तालुक्यातील तीनखुन्या(मोरखी)परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून साडे सहा लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत एका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीनखुन्या येथील शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध विदेशी मद्यसाठा लपवण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने शेतात पहाटे एकच्या सुमारास छापा टाकत अवैध विदेशी मद्य जप्त केले. यात व्हिस्कीची 74 खोकी, बिअरची 74 खोकी असा एकूण 6 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.