नंदूरबार - शहाद्यातील जामा मशीदीसमोरील काझी चौकात पोलीस प्रशासन आणि शांतता कमिटीतर्फे शुक्रवारी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मागील पंचवीस वर्षांपासून पोलीस प्रशासन आणि शांतता समितीतर्फे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते.
पोलीस प्रशासन, शांतता कमिटीतर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन - Dinu Gavit
मागील पंचवीस वर्षांपासून शहादा शहारातील जामा मशीदजवळ पोलीस प्रशासन आणि शांतता समितीतर्फे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते.
शहादा शहरात दरवर्षी रमजानमध्ये सर्व मुस्लीम बांधव आणि शहरातील सर्वधर्मीय समुदाय एकत्र येऊन रमजानचा पवित्र महिना साजरा करतात. शुक्रवारी शहादा शहरातील जामा मशीदीसमोरील काझी चौकात पोलीस प्रशासन आणि शांतता समितीतर्फे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी लोकसभा निवडणुकीदरम्यान पोलीस प्रशासन व्यस्त होते. त्यामुळे निवडणुका संपल्यानंतर रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. यावेळी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी सर्व मुस्लीम बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच येणारी रमजान ईद सर्व धर्मीय मिळून हर्षोल्हासात साजरी करू, अशी भावना व्यक्त केली. जिल्हा पोलीस प्रशासन नेहमी सर्वच धर्मांतील सण साजरे करण्यासाठी सर्वांना एकत्र आणून आनंदात साजरा करण्याची परंपरा आहे. इफ्तार पार्टीला शहरातील ज्येष्ठ नेते व पदाधिकारी आणि पोलीस प्रशासन तसेच मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन रोजा इफ्तार पार्टीचा आनंद साजरा केला.