नंदुरबार- आश्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शाळेजवळच गळफास घेऊन आत्महत्या ( Nandurbar student suicide ) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आकाश बावा तडवी ( वय 18 ) असे ( Akash Tadvi ) आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. हा विद्यार्थी धडगाव तालुक्यातील हातधुई येथील आश्रमशाळेत ( Hatdhui Student suicide ) शिकत होता.
आकाश बावा तडवी हा इयत्ता बारावी विज्ञान शाखेत होता. त्याने शाळेपासून काही अंतरावर असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत जळगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तर शवविच्छेदन अहवालानंतर आत्महत्येबाबत चौकशी समिती नेमली जाईल, असे प्रकल्प अधिकारी मौनिक घोष यांनी ( Project officer Maunik Ghosh ) सांगितले. मृत विद्यार्थी गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता झाला होता.
हेही वाचा-Murder In Raigad : जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच केली भावाची गोळ्या झाडून हत्या
शाळेपासून काही अंतरावरच विद्यार्थ्यांची आत्महत्या
शाळेपासून काही अंतरावर असलेल्या झाडाला आकाश बावा तडवी या विद्यार्थ्याचा मृतदेह गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यानंतर शाळा प्रशासनाने कुटुंबाला न कळविता परस्पर धडगाव पोलिसांना बोलवून पंचनामा केला. विद्यार्थ्याचे शवविच्छेदन करून आणल्यानंतर शाळा प्रशासनाने कुटुंबाला माहिती दिली. त्यामुळे या मुलाने आत्महत्या का केली याचे कारण अस्पष्ट आहे. मुलाच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आकाशच्या कुटुंबीयांनी केली आहे.