महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sarangkheda Yatra : घोडे बाजारात दोन दिवसात 60 लाखाची उलाढाल 11 लाखाला विकला 'कोहिनूर' - Kohinoor

सारंगखेडा (Sarangkheda Yatra) येथील घोडे बाजारात (Horse market) दोन हजार घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. दोन दिवसातच उलाढालीचा 60 लाखांचा टप्पा पार झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील उकळी येथील बाळूमामा मंदिरासाठी भक्तांनी 'कोहिनूर' (Kohinoor) हा घोडा व्यापारी हर्षल बच्छाव यांच्या कडून 11 लाखला खरेदी केला आहे.या वर्षी पहिल्या दिवसा पासून घोडे बाजारात तेजी आहे .

Sarangkheda yatra1
सारंगखेडा यात्रा1

By

Published : Dec 22, 2021, 12:04 PM IST

Updated : Dec 23, 2021, 5:21 PM IST

नंदुरबार:सारंगखेडा यात्रेसाठी राज्यासह परराज्यातूनही भाविक येतात. ही यात्रा घोडे बाजारासाठी प्रसिद्ध आहे. परिसरातील व्यावसायिक यात्रेत मोठ्या जोमाने व्यवसाय थाटतात. मात्र यंदा जिल्हा प्रशासनाने यात्रा रद्द केली आहे. फक्त घोडे बाजाराला नियम व अटी शर्तींवर परवानगी दिली आहे. सध्या दोन हजार अश्व विक्रीसाठी आले आहेत. एका दिवसात 75 घोड्यांच्या विक्रीतून 60 लाखाची उलाढाल झाली .यावर्षी हा घोडे बाजार 4 कोटीचा टप्पा पार करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सर्वात महाग विक्री झालेला कोहिनूरला 17 लाखांची बोली लागली होती. मात्र बाळू मामा मंदिरासाठी घोडा जात असल्याने 11 लाख 11हजार 111 रुपयांना घोडा विक्री दिल्याचे व्यापारी बच्छाव यांनी सांगितले.

तीनशे वर्षापूर्वीचे मंदिर
महानूभाव संप्रदायाचे उत्तर महाराष्ट्रातील भव्य एकमुखी दत्त मंदिर येथे आहे. यात्रोत्सव काळात देशभरातील भाविक येथे दर्शनासाठी येतात. सारंगखेडा दत्त मंदिर तीनशे वर्षापूर्वीचे आहे. कोरोना काळात दिड वर्ष मंदिर बंद होते. या काळात मंदिराच्या रंगरंगोटीसह अनेक कामे करण्यात आले. मंदिराच्या गाभाऱ्यांत मोहक असे काचेचे काम करण्यात आले आहे. संप्तरंगात असलेले हे काम राजस्थानातील कारागिरांनी राजस्थानी शैलीत, मोंगल कालीन शिल्प कलेशी साधर्म साधत बनवले आहे. मंदिराची रचना गोल वास्तूशास्त्रानुसार केलेली आहे. येथे प्रतिध्वनी निर्माण होऊन तो मंदिरातील गाभाऱ्यातच लुप्त पावतो.हे एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते.

सारंगखेडा येथील घोडे बाजार
जातिवंत घोड्यांसाठी प्रसिद्धजातीवंत घोड्यांचा बाजारासाठी देशभर प्रसिद्ध सारंगखेडा येथील एकमुखी श्री दत्त प्रभुच्या यात्रेच्या पूर्व संध्ये पर्यंत सुमारे दोन हजार पेक्षा अधिक घोड्याचे आगमन झाले. घोडयांचा टापांनी परिसर गजबजत आहे. गेल्या वर्षी बाजार रद्द करण्यात आला होता. यंदा या बाजाराला परवानगी दिल्याने बाजार बहरण्यास सुरवात झाली. या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यांतुन अश्व विक्रेते येतात. येथे विविध जातीवंत घोडे पहायला मिळतात. त्यांच्या राहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येते. घोडे निरिक्षकांसाठी पण व्यवस्था केली जाते. हॉर्स रायडिंगसाठी विशेष जागा उपलब्ध करण्यात आली आहे. लसीकरणा शिवाय प्रवेश नाहीसारंगखेडा यात्रोत्सवात घोडे विक्रीतून मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते. येथे कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. शौंकिंनांना घोडे पाहण्यासाठी लसीकरण प्रमाणपत्र दाखविल्या शिवाय प्रवेश दिला जात नाही. प्रशासनाच्यावतीने चार विशेष लसीकरण पथक तैनात करण्यात आले आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर लसीकरण केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे लसीकरण झाल्याचे सर्टीफिकीट पाहणी केली जात आहे. लसीकरण नसणाऱ्यांना लगेच लसीकरण केले जात आहे. 21 लाखाच्या सुलतानची एन्ट्री सारंगखेडा घोडे बाजारात यंदा 21 लाखांच्या सुलतान ची एंट्री झाली आहे. विक्रेता मोहम्मद भाई यांनी सांगितलेकी, २१ लाखांच्या सुलतान सर्वाधीक किमतीचा घोडा आहे. याहुन अधिक किंमतीचे घोडे दोन दिवसात दाखल होणार आहेत. हा बाजार पुन्हा एकदा कोट्यावधीच्या उलाढालाची भरारी घेईल असा जाणकारांचा अंदाज आहे. २७ डिसेंबर पर्यत चालणाऱ्या या बाजारात यंदा अश्वसौदर्य स्पर्धा रंगणार असुन बाजार सुरु होण्यापुर्वीचे सहा घोड्याची खरेदी विक्रीची नोंद देखील झाली आहे.
Last Updated : Dec 23, 2021, 5:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details