महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सारंगखेडा चेतक महोत्सवामध्ये अश्व सौंदर्य स्पर्धेचे आयोजन - अश्व सौंदर्य स्पर्धा सारंगखेडा

नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे घोड्यांच्या सौंदर्य स्पर्धांची सर्वाधिक रंगात पहायला मिळते. कोट्यवधी रुपये किंमत असलेले अश्व येथे पहायला मिळत आहेत. घोड्यांची ही सौंदर्य स्पर्धा चार वेगवेगळ्या गटात संपन्न होत असून शंभर पेक्षा जास्त घोड्यांनी सहभाग नोंदवला.

सारंगखेडा चेतक फेस्टिवल
सारंगखेडा चेतक फेस्टिवल

By

Published : Dec 22, 2019, 10:10 PM IST

नंदुरबार - महिला आणि पुरुषांच्या जशा सौंदर्य स्पर्धा होतात, तशाच त्या घोड्यांच्याही होत असतात. नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे घोड्यांच्या सौंदर्य स्पर्धांची सर्वाधिक रंगात पहायला मिळते. सारंगखेडा येथे सुरु असलेल्या घोड्यांच्या सौंदर्य स्पर्धेत देशभरातील नामवंत अश्व शौकिनांनी आपले अश्व या स्पर्धेसाठी आणले आहेत.

सारंगखेडा चेतक महोत्सवामध्ये अश्व सौंदर्य स्पर्धा


घोड्यांची चाल, त्यांचा रंग, रुबाब, त्यांची ठेवन आणि घोड्याचा स्वभाव हे या स्पर्धेचे निकष आहेत. कोट्यवधी रुपये किंमत असलेले अश्व येथे पहायला मिळत आहेत. घोड्यांची ही सौंदर्य स्पर्धा चार वेगवेगळ्या गटात संपन्न होत असून शंभरपेक्षा जास्त घोड्यांनी सहभाग नोंदवला.

हेही वाचा - अमरावतीच्या अवलियाने बांधले 'प्लास्टीकचे घर'

या स्पर्धेत घोड्यांच्या सर्व गुणांचा कस लागतो. त्यामुळे स्पर्धेतील घोड्यांची विशेष काळजी घेतली जाते. ही स्पर्धा पाहण्यासाठी हजारो अश्व शौकीनांनी सारंगखेड्यात हजेरी लावली. देशभरातून आलेले अश्वतज्ञ या स्पर्धेचे परिक्षण करतात.

ABOUT THE AUTHOR

...view details