महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये पावसाची जोरदार हजेरी ; 33 मी.मी.पावसाची नोंद

गेल्या दोन दिवसांपूर्वी शहादा, तळोदा तालुक्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर रात्री 2 वाजेच्या सुमारास विजेच्या प्रचंड कडकडाट आणि वादळासह पाऊस नंदुरबार परिसरात झाला.

नंदुरबार
नंदुरबार

By

Published : Jun 15, 2020, 10:06 AM IST

नंदुरबार - जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यासोबत वारा देखील मोठ्या प्रमाणावर वाहू लागल्याने काही काळ विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. 33 मी.मी.पावसाची नोंद झाली असून पाऊस आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

नंदुरबारमध्ये पावसाची जोरदार हजेरी

गेल्या दोन दिवसांपूर्वी शहादा, तळोदा तालुक्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर रात्री 2 वाजेच्या सुमारास विजेच्या प्रचंड कडकडाट आणि वादळासह पाऊस नंदुरबार परिसरात बरसला. वादळामुळे काही काळ वीजपुरवठा खंडीत झाला होता. रस्त्यावर पाणीच-पाणी साचले होते. शहादा-तळोदा तालुक्यात वादळी पावसामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत होता. मात्र, रात्री मुसळधार पाऊस बरसल्याने काही प्रमाणात का असेना, वातावरणात गरवा निर्माण झाला आहे. नंदुरबारमध्ये 33 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच तळोदा तालुक्यात 4, शहादा तालुक्यात 66, अक्कलकुवा तालुक्यात 14, अक्राणी तालुक्यात 8 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details