नंदुरबार -जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यातील गावांमध्ये आज दुपारी जोरदार पाऊस झाला. तासभर कोसळलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र, खरिपासाठी आणखी दमदार पावसाची आवश्यता आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नंदुरबार जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात जोरदार पाऊस
नंदुरबार तालुक्यातील आसाणे, रनाळे, सैताणे आदी गावांमध्ये अद्याप मान्सूनचा पाऊस बरसला नसल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र, आज झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या काही भागात पेरणीला वेग आला आहे. मागच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली होती.
नंदुरबार तालुक्यातील आसाणे, रनाळे, सैताणे आदी गावांमध्ये अद्याप मान्सूनचा पाऊस बरसला नसल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र, आज झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे. मागील वर्षी ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानंतर पुन्हा कोरोनाचे संकट ओढावले. मात्र, या सर्व संकटांना बाजूला सारत बळीराजाने खरिपाची संपूर्ण तयारी केली आहे.
दरम्यान, जिल्ह्याच्या काही भागात पेरणीला वेग आला आहे. मागच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली होती. त्या पावसावर शेतकऱ्यांनी कापूस लागवडीला सुरुवात केली आहे. तर ज्वारी, मका, सोयाबीन इतर पिकांच्या पेरणीलाही सुरुवात झाली आहे. प्रशासनाच्यावतीने शेतकऱ्यांना बियाणे आणि खते उपलब्ध व्हावेत, त्यांच्या काळा बाजार होऊ नये, म्हणून भरारी पथकांची नेमणूक केली आहे.