महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबार येथील तापी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

मध्यप्रदेशमध्ये तापी नदीच्या उगम स्थळावर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे हतनूर धरणाचे २२ दरवाजे २ मीटर ने उघडण्यात आले असून त्यातून ९४ हजार ७९८ क्युसेक वेगाने तापी नदी पत्रात पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे तापी नदीकाठावरील गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हतनूर धरण

By

Published : Sep 14, 2019, 9:57 AM IST

Updated : Sep 14, 2019, 10:37 AM IST

नंदुरबार- मध्यप्रदेशमध्ये तापी नदीच्य उगम स्थळावर मुसळधार पाऊस होत असल्याने हतनूर धरणाचे 22 दरवाजे दोन मीटर ने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे तापी नदी पत्रात पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे तापी नदीकाठवरील गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तापी नदीवरील गावांना सतर्कतेचा इशारा

मध्यप्रदेशमध्ये तापी नदीच्या उगम स्थळावर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे हतनूर धरणाचे २२ दरवाजे २ मीटर ने उघडण्यात आले असून त्यातून ९४ हजार ७९८ क्युसेक वेगाने तापी नदी पत्रात पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा आणि सारंगखेडा येथील तापी नदीवरील बॅरेजचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे तापी नदी काठावरील गावात संभाव्य पूरस्थिती लक्षात घेत नदीकाठावरील गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Last Updated : Sep 14, 2019, 10:37 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details