नंदुरबार -शहादा तालुक्यातील सातत्याने पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून अनेक गावांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात पावसाचा कहर विजयंत्रणा पाण्याखाली गेल्याने विद्युतपूरवठा खंडित
मुसळधार पावसाने विद्युत वितरण कंपनीचे कार्यालयच पाण्यात गेलं आहे. खबरदारी म्हणून तालुक्यातील काही गावांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात पावसाचा कहर शासकीय विश्राम गृहात सर्वत्र पाण्याचे साम्राज्य
शहादा येथील नवीन तहसील कार्यालयाचा समोरचा एक पूल वाहून गेला आहे . तसेच शहादा येथील शासकीय विश्राम गृहात सर्वत्र पाण्याचे साम्राज्य आहे.
दरा प्रकल्प पूर्ण भरल्याने प्रकल्पाचे तिन्ही दरवाजे उघडण्यात आले
शहादा तालुक्यातील दरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून त्याचे तिन्ही दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोमाई नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात पावसाचा कहर हेही वाचा...
नवापूरमधील सरपणी नदीवरील फरशी पूल गेला वाहून; अनेक गावांचा संपर्क तुटला
नंदुरबारात मुसळधार.. खर्डी नदीला पूर; अनेक घरात शिरले पाणी, नागन धरणातून विसर्ग सुरू