नंदुरबार -जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाले. वीज प्रवाहही खंडीत झाला होता. त्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली.
जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस; मालमत्तेचे नुकसान - नंदुरबार वादळी पाऊस
धडगाव तालुक्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला. वादळी वाऱ्यामुळे धडगाव तालुक्यात मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विजेच्या तारा तुटल्यामुळे वीज प्रवाह खंडीत झाला होता.
अवकाळी पाऊस
धडगाव तालुक्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी दोनच्या सुमारास वादळाने काही घरांचे पत्रे उडाले. या वादळात अनेक झाडंही उन्मळून पडली आहेत. त्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
आधीच लॉकडाऊनमुळे हैराण असलेला बळीराजा आता अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडला आहे. वादळी वाऱ्यामुळे धडगाव तालुक्यात मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.