नंदुरबार- हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज आज शहरात खरा ठरला आहे. शहर व परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. सायंकाळी 5 ते 6 वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस पडला. या वादळी वाऱ्यात अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहेत.
नंदुरबारमध्ये अवकाळी पावसाने लावली हजेरी हेही वाचा -COVID19: नंदुरबारमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी प्रत्येक गावात औषध फवारणी...
जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. संध्याकाळच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. तसेच नवापूर शहरातील 4 ते 5 घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. यावेळी घरांची पडझड झाल्यामुळे 2 जण जखमी झाले आहेत.
त्यामुळे ढगाळ वातावरण आणि पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांचे गहू व हरभरा पिक तयार झाले असून पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे.
हेही वाचा -नंदुरबारमध्ये संचारबंदीचे उल्लंघन.. ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल