नंदुरबार - जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासूनच सुरू असलेल्या पावसामुळे रंगावली नदीला महापूर आला आहे. पुराचे पाणी नदीवर असलेल्या पुलावरून जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच पावसाचा जोरही वाढत आहे. यामुळे सुरक्षितता म्हणून नवापूर तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
नंदुरबारमध्ये पावसाचा जोर वाढला, नवापूर तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा बंद - national highway number six
पावसाचा जोर वाढल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव नवापूर तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
नंदुरबारमध्ये पावसाचा जोर वाढला, नवापूर तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा बंद
गेल्या दोन वर्षांपासून या मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम बंद असल्याने खड्ड्यांमुळे महामार्गाची पार चाळणी झाली आहे. आता पावसामुळे या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासन या महामार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे.
Last Updated : Aug 4, 2019, 8:35 PM IST