नंदुरबार - मागील पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून जिल्ह्यात पावसाची 35 टक्के तूट भरून निघाली आहे. यंदाच्या तुलनेत गेल्या वर्षी कमी प्रमाणावर पाऊस झाल्याने बळीराजावर मोठे संकट होते. तर जिल्ह्यातील काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता.
नंदुरबारमध्ये संततधार; नद्या-नाल्यांना पूर - heavy rain in nandurbar
मागील पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून जिल्ह्यात पावसाची 35 टक्के तूट भरून निघाली आहे. यंदाच्या तुलनेत गेल्या वर्षी कमी प्रमाणावर पाऊस झाल्याने बळीराजावर मोठे संकट होते, तर जिल्ह्यातील काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता.
![नंदुरबारमध्ये संततधार; नद्या-नाल्यांना पूर monsoon in nandurbar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8446837-1099-8446837-1597642188513.jpg)
जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने सर्व नदी, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प देखील भरले आहेत. त्याचबरोबर शहराला पाणीपुरवठा करणारे अंबाबारी धरण व विरचक धरण पूर्णपणे भरले आहेत. या काळात जिल्ह्यातील नवापूर, तळोदा, अक्कलकुवा या तीन तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे, तर उर्वरित तीन तालुक्यांमध्ये 50 मिली पेक्षा अधिक पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
नदी-नाले प्रभावित झाल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणारा वीरचक्र आणि आंबेबारा धरण भरले असून वीरचक्र धरणातून ५१२ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणारे धरण भरल्याने नंदुरबारवासियांवरील पाणीटंचाईचे संकट टळले आहे. तर संततधार पावसामुळे विहिरी देखील भरल्या आहेत. भुईमूग, चवळी, मूग या पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. तर मे महिन्यात लागवड केलेल्या कापसाला देखील पावसाचा फटका बसलाय.