नंदुरबार - कोरोना योद्धा म्हणून ओळख असलेल्या जिल्हा रुग्णालयातील बंधपत्रित आरोग्य सेविकांनी नंदुरबारात कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जिल्हा रुग्णालयातील अधिपरिचारिकांची सेवा नियमित करावी, या मागणीसाठी 8 जून रोजी एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी आरोग्य मंत्रालयीन भोंगळ कारभाराचादेखील निषेध करण्यात आला. वारंवार पाठपुरावा करून देखील परिचारिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने पुकारलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
कोरोना योद्धा असलेल्या बंधपत्रित आरोग्य सेविकांचे नंदुरबारमध्ये कामबंद आंदोलन
शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 29 मे रोजी काढण्यात आलेला शासन निर्णय रद्द करण्याची मागणी या आरोग्यसेविकांनी केली आहे.
नंदुरबार जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या बंधपत्रित परिचारिका यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन केले. पाच वर्षापासून सेवा देणाऱ्या या कर्मचार्यांना शासन निर्णयानुसार एकत्रित मानधन पंचवीस हजार रुपये प्रतिमहिना देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, हा निर्णय या संघटनेला मंजूर नाही. कोरोनासारख्या परिस्थितीत हे कर्मचारी आपली सेवा देत आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांना भेदभावाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.
यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 29 मे रोजी काढण्यात आलेला शासन निर्णय रद्द करण्याची मागणी या आरोग्यसेविकांनी केली आहे. त्याप्रमाणे मागण्या मान्य न झाल्यास पुढील आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला आहे.