महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Cold Weather Affect Fruit Orchards : कडाक्याच्या थंडीचा फळ बागांवर परिणाम होण्याची शक्यता ; कमी तापमानात अशी 'घ्या' काळजी - फळ बागांवर परिणाम नंदुरबार

उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात तापमानात घट झाली (Hard cold weather in Nandurbar District)आहे. नंदुरबार जिल्ह्यात अजून दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याने याचा परिणाम फळ पिकांवर होण्याची शक्यता (cold weather likely to affect fruit orchards) आहे. कमी तापमानामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. त्यासाठी उपाय योजना महत्वाच्या आहेत.

Cold Weather Affect Fruit Orchards
थंडीचा फळ बागांवर परिणाम

By

Published : Nov 22, 2022, 1:15 PM IST

नंदुरबार : जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात तापमानात घट झाली आहे. जिल्ह्यात अजून दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याने याचा परिणाम फळ पिकांवर होण्याची शक्यता (cold weather likely to affect fruit orchards) आहे. कमी तापमानामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. त्यासाठी उपाय योजना महत्वाच्या आहेत. जिल्ह्यातील सपाटी भागात तापमान १० अंश सेल्सिअसवर, तर सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये तापमान ८ अंशाच्या खाली जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरत आहे.

प्रतिक्रिया देताना प्रा डॉ.पद्माकर कुंदे कृषी विज्ञान केंद्र


कृषी विभागातर्फे मार्गदर्शन :उत्तर महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून थंडीची लाट आहे. ती अजून काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या पपई आणि केळीचा बागांची काळजी घेतली पाहिजे. केळीच्या घडांना प्लास्टिक पेपरने आच्छादन करावे. तसेच बागांना रात्रीचे पाणी दिल्यास बागांमधील तापमान नियंत्रित राहते. तसेच बागांमध्ये शकोटी करावी, त्याचा फायदा बागांना होतो. त्याचसोबत पिकांवरील दुष्परिणाम होणार नाहीत, या काळात आपल्या बागांची काळजी घेणे महत्वाचे असल्याचे कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. डॉ पद्माकर कुंदे यांनी सांगितले (Hard cold weather in Nandurbar District) आहे.



जिल्ह्यात कडाक्याची थंडी :नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरत (cold weather likely to affect) आहे. सपाटी भागात तापमान १० अंश सेल्सिअसवर आहे. तर सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये पारा आठ अंश सेल्सिअसच्या खाली उतरला आहे. त्यामुळे या भागात थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. रात्री आणि सकाळी नागरिक थंडीपासून रक्षणासाठी शेकोट्यांचा आधार घेत असल्याचे चित्र या भागात पाहण्यास मिळत आहे. तर दुसरीकडे वाढलेला गारठा हा रब्बी पिकांसाठी पोषक असल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधान दिसून येत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक उबदार कपडे आणि शकोट्याचा आधार घेत आहेत. असा सल्ला हवामान तज्ञांनी दिला (Cold Weather Affect Fruit Orchards) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details