नंदुरबार - जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात उपचार घेणाऱ्या तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला करण्यात आला आहे.
कोरोना कक्षात उपचार घेणाऱ्या तरुणीचा विनयभंग, गुन्हा दाखल
नंदुरबार जिल्हा रुग्णालयात कोविड १९ उपचार कक्ष तयार करण्यात आले आहे. या कक्षात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. काही दिवसांपासून संबंधित तरुणीवर या ठिकाणी उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान या तरुणीची ईसीजी करत असताना कक्षातील एका वार्डबॉयने या तरुणीचा विनयभंग केला.
नंदुरबार जिल्हा रुग्णालयात कोविड १९ उपचार कक्ष तयार करण्यात आले आहे. या कक्षात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. याच काही दिवसांपासून संबंधित तरुणीवर याठिकाणी उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान या तरुणीची ईसीजी करत असताना कक्षातील एका वार्डबॉयने या तरुणीचा विनयभंग केला. याबाबत त्या तरुणीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सातपुते यांच्याशी संपर्क सांगून त्यांना घडलेली हकिकत सांगितली. याबाबत तरुणीने नंदुरभार शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियदर्शनी थोरात करत आहेत.