महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट - Nandurbar marathi news

महाराष्ट्रातील दोन नंबरचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथे दुपारी चार वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जवळपास पंधरा ते वीस मिनिटं चाललेल्या या गारपिटीमुळे नागरिक सैरावैरा झाले होते.

नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट
नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट

By

Published : Feb 18, 2021, 6:55 PM IST

नंदुरबार - नंदुरबार जिल्ह्यात हवामान खात्याच्या वतीने 18 आणि 19 तारखेला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज व्यक्त केला होता. आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास धडगाव आणि नवापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली. धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथे वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. तर नवापूर तालुक्यातील वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सोनखांब, जामनपाडा पानबारा, चौकी, मोरकरंजा व कोंडाईबारी घाटात सात मिनिटापर्यंत गारपीट झाल्याने शेतातील कांदा, भुईमूग, मूग, गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासोबतच वादळी वाऱ्याने आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट

थंड हवेच्या ठिकाणी गारपीट-

महाराष्ट्रातील दोन नंबरचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथे दुपारी चार वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जवळपास पंधरा ते वीस मिनिटं चाललेल्या या गारपिटीमुळे नागरिक सैरावैरा झाले होते.

नवापूर तालुक्यात गारपीट ; पीकाचे नुकसान-

नवापुर तालुक्यातील वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सोनखांब, जामनपाडा, पानबारा, चौकी, मोरकरंजा व कोंडाईबारी घाटात सात मिनिटापर्यंत गारपीट झाल्याने शेतातील कांदा, भुईमूग, मूग, गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासोबतच वादळी वाऱ्याने आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडित-

नवापूर तालुक्यातील ग्रामीण पुर्व भागातील बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. जोरदार अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे शेतातील मुग, गहू आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे आंब्याचेही नुकसान झाले असून गारपीटमुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.


अवकाळी पावसामुळे पुन्हा शेतकरी चिंतेत-

अवकाळी पावसाचा फटका नवापूर तालुक्यात कमी अधिक प्रमाणात बसला आहे. रब्बी पिकांची काढणी सुरू असतांनाच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस सुरुच असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सायंकाळी सुरू झालेला पाऊस कमी अधिक प्रमाणात गुरूवारी संध्याकाळी बरसत होता. अनेक ठिकाणी गारपीट झाली. दुसऱ्यांदा झालेल्या अवकाळी पावसामुळे पुन्हा शेतकरी हवालदिल झाला असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

हेही वाचा-मुंबईतील कोरोनाचे नवे 'हॉटस्पॉट' - बोरीवली, अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूरमध्ये रुग्णवाढ

ABOUT THE AUTHOR

...view details