नंदुरबार -गुजरातमधून शहादा तालुक्यात जाणाऱ्या महिंद्रा पीकअप या गाडीतून सुमारे सात लाखांचा गुटखा जप्त करण्यात आाला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तळोदा तालुक्यातील बोरद फाट्याजवळ ही कारवाई केली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. शंकर डोग्या वसावे, विरसिंग ओट्या वसावे दोन्ही (रा.वाडी पुर्नवसन ता.शहादा), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
महिंद्रा पिकअप गाडीतून सात लाखांचा गुटखा जप्त; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई - नंदुरबार गुटखा बातमी
शहादा तालुक्यात जाणाऱ्या महिंद्रा पीकअप या गाडीतून सुमारे सात लाखांचा गुटखा जप्त करण्यात आाला आहे.
महिंद्रा पिकअप क्र.एमएच 39 एडी 1036 या गाडीमध्ये गुटखा भरुन ती गाडी शहादा तालुक्यातील वाडी पुर्नवसन येथे नेण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे तळोदा तालुक्यातील बोरद फाट्याजवळ या गाडीवर छापा टाकून या गाडीची तपासणी करण्यात आली. यावेळी गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला. या गुटख्याची किंमत सात लाख सात हजार रुपये असून या कारवाई दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाद्वारे सात लाखांचा गुटखा तसेच महिंद्रा पीकअप गाडी, असा एकूण 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा गुटखा गुजरामधील कुकरमुंडा येथील राहुल हरी सिंधी यांच्याकडुन खरेदी करुन शहादा तालुक्यातील वाडी पुर्नवसन येथील शंकर वसावे यांच्याकडे आणला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दिली आहे.
हेही वाचा- 'हात धुवा' उपक्रमासाठी रोहिणी भाजीभाकरे-बिद्रींची गिनीज बुकमध्ये नोंद!