महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सूक्ष्म सिंचन वाढवण्यावर भर द्या; पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांच्या सूचना - सूक्ष्म सिंचन

आदिवासी विकास मंत्री आणि नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन सुविधा वाढवण्यावर भर द्यावा. वनपट्टयात बांधलेल्या विहिरींसाठी वीज कनेक्शन देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

review meeting
खरीप हंगाम आढावा बैठक

By

Published : May 1, 2020, 10:08 AM IST

नंदुरबार -जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन सुविधा वाढवण्यावर भर द्यावा. वनपट्टयात बांधलेल्या विहिरींसाठी वीज कनेक्शन देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी दिले अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या खरीप हंगाम आढावा बैठकीत ते बोलत होते.

नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम आढावा बैठक घेतली

शेतकर्‍यांना वेळेवर कर्ज मिळवून देण्यासाठी बँक अधिकार्‍यांची बैठक घेण्यात यावी. कापूस खरेदी वेळेवर सुरू होईल यासाठी तातडीने उपाययोजना करावी. शेतकर्‍यांना खते, बियाणे आणि इतर कृषी निविष्ठा वेळेवर मिळतील यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील बंधार्‍यांच्या दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण होतील याचे नियोजन करावे. लघू पाटबंधारे विभागाच्या बंधार्‍यांच्या दुरुस्तीसाठीचे अंदाजपत्रक त्वरीत सादर करावे, अशा सूचना पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी दिल्या.

खरीप हंगाम 2020-21 साठी एकूण 38 हजार 668 क्विंटल बियाणांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली होती. त्यानुसार बियाणे उपलब्ध होणार आहेत. महाबीजमार्फत बियाण्याची उपलब्धता होणार आहे. खरीप हंगामासाठी 1 लाख 18 हजार 160 मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आली असून 1 लाख 10 हजार 875 मेट्रिक टन खते उपलब्ध होणार आहेत. किटकनाशके फवारणीबाबत शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. कृषी निविष्ठा विषयक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड. सीमा वळवी, खासदार डॉ. हिना गावीत, आमदार डॉ. विजयकुमार गावीत, आमदार राजेश पाडवी, आमदार शिरीष नाईक, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अॅड. राम रघुवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.एन.पाटील आदी उपस्थित होते. यावेळी कापूस पिकाबाबत शेतकर्‍यांमध्ये जागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details