नंदुरबार - तापी नदी पात्रातील वाळूचे मोठ्या प्रमाणात उत्खनन केल्या जात होते. त्या वाळूची नंदुरबार मार्गे नाशिकला वाहतूक करण्यात येत होती. यात शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत होता. त्यामुळे वाळू घेऊन जाणाऱ्या वाहनांवर जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या आदेशानंतर प्रशासनाचे कारवाईचा धुमधडाका लावला आहे.
तापी नदीतील वाळू चाेरट्यांवर प्रशासनाची कारवाई; 82 लाख रुपये दंडाची वसुली - धुमधडाका
जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या आदेशानंतर प्रशासनाचे वाळू तस्करांवर कारवाईचा धुमधडाका लावला आहे. कारवाईमध्ये तब्बल 31 वाहने जप्त करण्यात आले. तसेच तब्बल 82 लाख 95 हजार 60 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
दोन दिवसांच्या या कारवाईमध्ये तब्बल 31 वाहने जप्त करत जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले आहे. तसेच सदर वाहनांचे पंचनामे करून आतापर्यंत तब्बल 82 लाख 95 हजार 60 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
गुजरात राज्याच्या हद्दीतील तापी नदी पात्रातील वाळू उत्खनन करून नंदुरबार मार्गे नाशिक जिल्ह्याला वाहून नेली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नसतानाही ही वाहतूक सुरु होती. तसेच गुजरात राज्यातून वाळू कमी दरात खरेदी करून नाशिक जिल्ह्यात जादा दराने विक्री करण्यात येत होती. शिवाय ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था होत होती. परिणामी यात जिल्हा प्रशासनाचा महसूल बुडत होता. परंतू प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे वाळू व्यावसायिकांवर चांगलाच चाप बसला आहे.