महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबार जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद - Nandurbar district administration

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना इतर शस्त्रक्रीयांसाठी आवश्यक रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे रक्तदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांनी केले होते. या पार्श्वभुमीवर नंदुरबार जिल्हा प्रशासनातर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले.

रक्तदान शिबिर
रक्तदान शिबिर

By

Published : Dec 17, 2020, 4:13 PM IST

नंदुरबार -जिल्हा प्रशासनातर्फे पोलीस मुख्यालयातील गंधर्व हॉल येथे आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. शिबिरात दुपारपर्यंत 126 व्यक्तींनी रक्तदान केले. नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केले.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

अधिकाऱ्यांची उपस्थिती-

यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपायुक्त अर्जुन चिखले, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे आदी उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांनी रक्तदान केल्याबद्दल समाधानी: विभागीय आयुक्त

यावेळी राधाकृष्ण गमे म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना इतर शस्त्रक्रीयांसाठी आवश्यक रक्ताचा तुटवडा भासत आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना रक्ताची आवश्यकता आहे. अशावेळी नंदुरबार जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या रक्तदान शिबिरामुळे रुग्णांना आवश्यक रक्त उपलब्ध करून देणे शक्य होईल. या शिबिरात शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रक्तदान केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

रक्ताचा तुटवडा असल्याने शिबिराचे आयोजन: जिल्हाधिकारी

डॉ. राजेंद्र भारुड म्हणाले की, राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा असल्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराच्या माध्यमातून अधिकाधिक रक्त पिशव्यांचे संकलन करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ.भारुड यांनी स्वत: सकाळी रक्तदान केले. शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच नागरीकांनी रक्तदान शिबिरात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.

रक्तदात्यांचे वाढविली मनोबल-

शिबिरात महसूल विभागाच्या व पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्वतः त्यांची विचारपूस केली व रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

126 जणांनी केले रक्तदान-

प्रशासनातर्फे आयोजित रक्तदान शिबिरात महसूल विभागाच्या व पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह 126 जणांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केले. याप्रसंगी रक्तदान करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला. यावेळी उप‍जिल्हाधिकारी सुधीर खांदे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शासकीय रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

हेही वाचा-पंतप्रधान मोदी मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांशी साधणार संवाद

हेही वाचा-गीता कुटुंबाच्या शोधात नाशिकमध्ये; माझी मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या आईला गीता ओळखत नाही

ABOUT THE AUTHOR

...view details