नंदुरबार - शहादा शहरातून दुधाचे कॅन चोरी झाल्याची घटना महिनाभरापूर्वी घडली होती. या प्रकरणातील कॅन चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुरुवारी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून दूध संकलनासाठी वापरण्यात येणारे तब्बल शंभर कॅन हस्तगत करण्यात आले आहेत. अवघ्या महिन्याभरातच नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आहे.
शहादामधून दुधाचे 100 कॅन चोरी करणारी टोळी जेरबंद, चौघांना अटक - नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण
दुध उत्पादक व कृषी पुरक उद्योग सहकारी संघाच्या मागील कार्यालयात दुधाचे कॅन ठेवण्यात आलेले होते. त्या कार्यालयाचे लोखंडी शटर तोडून चोरट्यांनी तब्बल एक लाख रुपये किंमतीचे शंभर स्टीलचे कॅन चोरले होते.
कार्यालयाचे शटर तोडून कॅनची चौरी-
शहादा शहरातील दुध उत्पादक व कृषी पुरक उद्योग सहकारी संघाच्या मागील कार्यालयात दुधाचे कॅन ठेवण्यात आलेले होते. त्या कार्यालयाचे लोखंडी शटर तोडून चोरट्यांनी तब्बल एक लाख रुपये किंमतीचे शंभर स्टीलचे कॅन चोरले होते. याबाबत कृषी पुरक उद्योग सहकारी संघाचे व्यवस्थापक उद्धव भबुता पाटील यांच्या तक्रारीवरून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी या चोरीचा छडा लावला आहे.
एलसीबीने लावला छडा, चौघांना अटक
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयितांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना तपास पथकाला दिल्या होत्या. कळमकर यांना दूध उत्पादक संघात झालेल्या चोरीतील संशयितांबद्दल माहिती मिळाली. मलोणी ता.शहादा येथील विशाल भगवान ठाकरे याने आपल्या पाच ते सहा साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे विशाल यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तात्काळ मलोणी येथून अटक केली. त्यानंतर त्याचे साथीदार अविनाश काशिनाथ सामुद्रे, राजेश ब्रिजलाल भिल (दोन्ही रा.लहान शहादे), रविंद्र भगवान भामरे (रा.मलोणी) यांना अटक करण्यात येवुन त्यांच्याकडुन चोरीस गेलेले दुधाचे सर्व कॅन हस्तगत करण्यात आले.
भुरट्या चोरट्यांची टोळी सक्रिय-
शहादा शहर व तालुक्यात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण देखील वाढू लागले होते. शहरी भागातून दुचाकी चोरीचे प्रमाण घरफोड्या तसेच शेतातून जलपरी शेती उपयोगी साहित्यांची चोरीची प्रमाण वाढू लागले होते. चोरट्यांची टोळी सक्रिय होऊ लागली होती. शहाद्यात दूध कॅन चोरी झाल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या पथकाने केली कारवाई-
शहादा येथील दूध कॅन चोरांचा तपास पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक गृह देवराम गवळी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस हवालदार दिपक गोरे, पोलीस नाईक राकेश मोरे, पोलीस अंमलदार विजय ढिवरे, अभय राजपूत, आनंदा मराठे, सतिष घुले यांच्या पथकाने केली.