नंदुरबार स्थानकावर 12993 गांधीधाम-पुरी एक्स्प्रेसच्या डब्बांना लागलेली आग नियंत्रणात आली आहे.
Puri Express Catch Fire : गांधीधाम पुरी एक्सप्रेसला नंदुरबार स्थानकाजवळ भीषण आग - Puri Express Catch Fire

12:46 January 29
एक्स्प्रेसच्या डब्बांना लागलेली आग नियंत्रणात
12:33 January 29
ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा
ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा
11:07 January 29
नंदुरबार: गांधीधाम-पुरी एक्सप्रेसच्या (Gandhidham Puri Express catches fire) दोन डब्यांना नंदुरबार रेल्वे स्थानकापासून (Nandurbar Railway Station) काही अंतरावर आग लागली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याची माहिती समोर आलेली नाहीे. मात्र, आग ही वाढत असल्याचे पहायला मिळत आहे.
गांधीधाम येथून पुरीच्या दिशेने ही ट्रेन निघाली होती. गाडी नंदुरबार रेल्वे स्टेशनपासून अवघ्या काही अंतरावर असताना एक्सप्रेसमधील पॅन्ट्रीच्या डब्यात अचानक आग लागली. हा प्रकार लक्षात येताच ट्रेन तात्काळ थांबवण्यात आली. नंतर रेल्वेतील प्रवाशी गाडीतून बाहेर पडले.
घटनास्थळी नंदुरबार अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम मोठ्या वेगाने सुरू आहे. ज्या डब्यांना आग लागली होती ते दोन डबे इतर डब्यांपासून वेगळे करण्यात आले आहेत. या डब्यांना लागलेली आग विझवण्यात येत असून दोन डब्यांत कुलिंग ऑपरेशनचे काम सुरू आहे.
एक्सप्रेसमधील पॅन्ट्रीच्या डब्याला ही आग लागली. पॅन्ट्रीच्या डब्यात खानपानाचे साहित्य, सिलिंडर असल्याने आगीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला. सध्यातरी रेल्वेत कुणीही प्रवासी नाहीत मात्र, सर्व प्रवाशांचे साहित्य ट्रेनमध्ये आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, रेल्वेचे प्रशासनाकडून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.