महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 21, 2020, 8:06 AM IST

Updated : Oct 21, 2020, 5:22 PM IST

ETV Bharat / state

धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर बस दरीत कोसळली; पाच जणांचा मृत्यू तर 35 जण गंभीर

धुळे ते सुरत या राष्ट्रीय महामार्गावर कोडाईबारी घाटात भीषण अपघात झाला असून यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य 35 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून गंभीर जखमींना 3 जणांना उपचारार्थ सुरतला पाठवण्यात आले आहे

accident in nandurbar
धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर बस दरीत कोसळसी; चौघांचा मृत्यू तर 35 जण गंभीर

नंदुरबार : धुळे ते सुरत महामार्गावर कोडाईबारी घाटात खासगी ट्रॅव्हल्सची बस सुमारे 40 फूट दरीत कोसळून पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर 35 प्रवासी जखमी झाले आहेत. ही माहिती मिळताच विसरवाडी व नवापूर पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी सुरत येथे पाठविण्यात आले आहे. तर मृतांची ओळख पटवण्याचे काम पोलीस यंत्रणा करीत आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहिती

शुभम कंपनीची खासगी बस(जी.जे. 05 ए. व्ही. 8501) जळगावहून सुरतकडे जात असतांना बुधवारी पहाटे 2:10 च्या सुमारास कोडाईबारी घाटातील दर्ग्याजवळील पुलाखाली कोसळल्याने भीषण अपघात झाला. पुढे चालत असलेल्या किंग ट्रॅव्हल्सला(जी. जे. 14 एक्स 3111) अपघातग्रस्त शुभम ट्रॅव्हल्सने साईडने धडक दिल्याने शुभम ट्रॅव्हल्सच्या चालकांचे नियंत्रण सुटले आणि बस 40 फूट खोल नदीत कोसळली. या भीषण अपघातात 5 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. किंग ट्रॅव्हल्सचा पत्रा फाटल्याने 4 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर, शुभम ट्रॅव्हल्समधील 35 जण असे एकूण 40 प्रवासी जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकृत पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. 34 जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर, 26 जणांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. इतर 3 गंभीर जखमींना उपचारार्थ सुरतला पाठवण्यात आले आहे. जखमींची संख्या जास्त असल्यामुळे विसरवाडी, नवापूर, खांडबारा, नंदुरबार, पिंपळनेर, दहिवेल येथील 108 रुग्णवाहिका यांचे पाचारण करण्यात आले असून उपचारासाठी तातडीने विसरवाडी रुग्णालयात हलविण्याचे काम रुग्णवाहिकेद्वारे सुरू आहे.

घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त आहे. अपघातादरम्यान काही काळ वाहतूक ठप्प होती परंतु आता वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. बस मध्ये पाय अडकलेल्या सह चालकाला गॅस कटरच्या सहाय्याने बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर विसरवाडी पोलीस यांनी देखील जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत कार्य केले. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, विजयसिंह राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर नवले घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा -नवापूरमध्ये शेतकऱ्याकडून लाच स्वीकारणाऱ्याला व्यवस्थापकास अटक

Last Updated : Oct 21, 2020, 5:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details