महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवापूर तालुक्यातील जामतलाव येथून 12 लाखांच्या सागासह मुद्देमाल जप्त - नंदुरबार अवैध लाकूडसाठ्यावर वनविभागाची कारवाई

नवापूर तालुक्यातील जामतलाव येथे एका घरात अवैध तोड केलेल्या सागाच्या लाकडापासून साहित्य बनविण्यात येत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. याची दखल घेत वनविभागाने या घरावर छापा टाकला. या कारवाईत लाकूड साठ्यासह रंधा मशीन, दोन वाहने असा एकूण सुमारे 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नंदुरबार अवैध लाकूडसाठ्यावर वनविभागाची कारवाई
नंदुरबार अवैध लाकूडसाठ्यावर वनविभागाची कारवाई

By

Published : Oct 3, 2020, 12:44 PM IST

नंदुरबार -नवापूर तालुक्यात अवैधरीत्या तोड झालेल्या सागाच्या लाकडापासून साहित्य बनविण्यात येत असलेल्या घरावर छापा टाकला. या कारवाईत लाकूड साठ्यासह रंधा मशीन, वाहन असा एकूण सुमारे 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तालुक्यातील जामतलाव येथे एका घरात अवैध तोड केलेल्या सागाच्या लाकडापासून साहित्य बनविण्यात येत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. याची दखल घेत सहायक वनसंरक्षक नंदुरबार, नवापूर, चिंचपाडा, खांडबारा, शहादा, काकरडा व धुळे वनविभागातील कोंडाईबारी, अमळनेर येथील वनविभागाच्या संयुक्त पथकाने जामतलाव येथे जाऊन परेश सुरेश गावीत याच्या घराची झडती घेतली. यावेळी घरात ताज्या तोडीचे साग चौपाटचे 6 नग व रंधा डिझाईन मशीन, पायउतार मशीन, डिझेल इंजिन मशीन आणि दोन वाहने सापडली. ती जप्त करण्यात आली आहेत.

हेही वाचा -हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ नंदुरबारमध्ये विविध संघटनांकडून मूकमोर्चा

या कारवाईत तब्बल 12 लाखांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. ही कारवाई नंदुरबार सहायक वनसंरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव), नवापूर पोलीस विभाग, नंदुरबार वनविभाग व धुळे वनविभाग येथील वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक आणि मोबाईल स्कॉड शहादा यांच्या पथकाने केली.

हेही वाचा -धुळे-सुरत महामार्गावर 7 लाखांचा अवैध गुटख्यासह मुद्देमाल जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details