नंदुरबार -नवापूर तालुक्यातील मौजे जामतलाव रस्त्यावर ताज्या तोडीचे अवैध साग लाकडाने भरलेले एक वाहन जप्त करण्यात आले आहे. या वाहनाचा चालक वनविभागाची गाडी येताना दिसताच आपले वाहन बंद करून पसार झाला. त्यानंतर हे वाहन शासकीय विक्री आगार येथे जमा करण्यात आले आहे.
नवापूर तालुक्यात सागाची तस्करी; वाहनासह लाकूडसाठा जप्त - चिंचपाडा वनक्षेञ
नवापूर तालुक्यातील मौजे जामतलाव रस्त्यावर ताज्या तोडीचे अवैध साग लाकूडाने भरलेली गाडी जप्त करण्यात आली. सदर वाहन जप्त करुन शासकीय जीपने दोर बांधून टोचन करुन शासकीय विक्री आगार येथे जमा करण्यात आले आहे.
नवापूर तालुक्यातील मौजे जामतलाव रस्त्यावर वनविभागाचे कर्मचारी जीपने गस्त घालत असताना पायविहीर रस्त्याने एक वाहन येताना दिसले. कर्मचाऱ्यांना या वाहनाचा संशय आल्याने जामतलाव चौफुलीवर त्यांनी ते वाहन अडविण्यासाठी पवित्रा घेतला. पण वनविभागाची गाडी समोरुन येताना दिसताच गाडीचा चालक लगेच गाडी बंद करुन पळून गेला. वनविभागातर्फे जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात साग चौपाट व खैर नग (२० घ.मी.०.८४७) आणि टाटा सुमो कंपनीची विना नंबरची पांढऱया रंगाची गाडीसह ३ लाख ३१ हजार किमतीचा माल मिळाला. यात सदर आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
तसेच चिंचपाडा वनक्षेत्रातील नियतक्षेत्र पिंपळा क्र.म.११२ या राखीव वनात सांयकाळी ६ च्या दरम्यान ट्रॅक्टरचा सहायाने नवीन अतिक्रमण क्षेत्रात विना परवानगीने नांगरनी करीत असता, ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. सदर वाहन नंदुरबार शासकीय विक्री आगार येथे जमा करण्यात आले आहे. सदर आरोपी विरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन पुढील कार्यवाही सुरू आहे.