नंदुरबार - तोरणमाळ येथील सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात मोठ्या प्रमाणात वनऔषधी होत्या. मात्र, कालांतराने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने या वनऔषधी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, त्याच्या संगोपनासाठी तोरणमाळ वनक्षेत्र विभागाने पुढाकार घेऊन वनौषधी उद्यान (बॉटनिकल गार्डन) विकसित केले. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी हे उद्यान आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे.
तोरणमाळ वनक्षेत्रात वन विभागाने साकरले बॉटनिकल गार्डन; पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र - officer
तोरणमाळ येथील सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात मोठ्या प्रमाणात वनऔषधी होत्या. मात्र, कालांतराने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने या वनऔषधी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
नवीन पिढीला वन औषधांची ओळख व्हावी, त्याचसोबत आपल्या परिसरात आढळणाऱ्या झाडातील औषधी गुण कळावेत म्हणून तोरणमाळ येथे वनविभागाने बॉटनिकल गार्डन विकसित केले आहे. यामद्ये विविध प्रकारचे नष्ट होणारे वनौषधी झाडे लावण्यात आले आहे. या उद्यानाचे संगोपन वनविभागाद्वारे केले जात आहे. प्रत्येक झाडासमोर त्याचे नाव आणि त्याचा उपयोग कोणत्या आजारावर होतो, त्याची पाटी या ठिकाणी लावण्यात आली आहे, या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना वनौषधीची माहिती होत आहे. त्याचसोबत आपल्या आजूबाजूला दिसणार्या झाडाच्या वनऔषधी गुणांची माहिती आपल्याला नसते. मात्र, याठिकाणी भेट दिल्यावर आपल्याला अशा अनेक गोष्टींची ओळख होत असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
येथे विविध प्रकारच्या वनौषधींची माहिती मिळते, त्याचसोबत कोणत्या आजारावर कोणत्या वृक्षाचा पान-फूल आणि साल याचा उपयोग होतो, हे कळते याबरोबर वनविभागाने नष्ट होणाऱ्या प्रजाती आणि औषधी वनस्पतींचे संगोपन केले, ते कौतुकास्पद असल्याचे पर्यटक सांगतात. पारंपरिक औषधांची माहिती व्हावी म्हणून आपल्या रोजच्या जगण्यात आपल्या डोळ्यासमोर दिसणार या वनस्पतीची औषधी उपयोग काय? हे समजण्यासाठी नष्ट होत चाललेल्या वन औषधी वनविभागाच्यावतीने तोरणमाळ येथे बॉटनिकल गार्डन उभारून एक चांगला उपक्रम सुरू केला असल्याचे सांगत आहेत.