नंदुरबार - अक्कलकुवा तालुक्यात गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे नैनशेवाडी गावाजवळून गेलेल्या नदीला पूर आला आहे. पुरामुळे गावाचा संपर्क तुटला असून गावकऱ्यांना जीव धोक्यात घालून नदी पार करावी लागत आहे. दरम्यान, प्रशासनाकडून योग्य उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी गावकरी करत आहेत.
नंदुरबार : नैनशेवाडी गावात पुराचे थैमान; संपर्क तुटला - नैनशेवाडी पूरस्थिती
अक्कलकुवा तालुक्यात गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे नैनशेवाडी गावाचा संपर्क तुटला असून गावकऱ्यांना जीव धोक्यात घालून नदी पार करावी लागत आहे. शासन दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे
नैनशेवाडी गावात पुराचे थैमान
हेही वाचा -नंदुरबार येथील तापी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
दरवर्षी गावाजवळील नदीवरचा फरशी पुल पाण्याखाली जातो. त्यामुळे बऱ्याचवेळा पावसाळ्याचे चार महिने नैनशेवाडी गावाचा संपर्क तुटतो. अशावेळी विद्यार्थी आणि रुग्णांनादेखील नदीच्या पाण्यातून जावे लागते. अचानक नदीच्या पाण्यात वाढ झाल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासन दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे