नंदुरबार - जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन आणि जिल्ह्यातील खासदार, आमदार उपस्थित होते.
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण - jaykumar rawal
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्ह्यात विविध योजनांचा लाभ घेऊन चांगली कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना व महिला बचत गट आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्ह्यात विविध योजनांचा लाभ घेऊन चांगली कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना व महिला बचत गट आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पाणी प्रश्न मिटला आहे. तसेच पूरग्रस्त स्थितीमुळे अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.