नंदुरबार - भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी पोलीस व्हॅन, ॲम्बुलन्स व एटीएम यांचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर जिल्हा रक्त पेढीचे व तालुका पोलीस ठाण्याचे उद्घाटनही करण्यात आले.
ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी लोकप्रतिनिधींची उपस्थिती
या सोहळ्याला जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, खासदार डॉ.हिना गावीत, आमदार राजेश पाडवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जि.प.उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी, समाजकल्याण सभापती रतनदादा पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मलाताई राऊत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री ॲड.पाडवी यांच्या हस्ते कोरोना संकटकाळात चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
विविध पुरस्काराचे वितरण
पालकमंत्र्यांच्या हस्ते गुणवंत खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता आणि गुणवंत दिव्यांग खेळाडू पुरस्कारांचे वितरण देखील करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शासकीय व खासगी रुग्णालयांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत गुणवत्तेनुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुरस्काराचे वितरण देखील करण्यात आले. सशस्त्र ध्वजदिन निधी संकलन-2019 करीता 31 लाख 30 हजार इतका इष्टांक नंदुरबार जिल्ह्याने वेळेच्या आत पुर्ण केल्याबद्दल संचालक, सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्यामार्फत उत्कृष्ट कार्याबद्दल देण्यात येणारा पुरस्कार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयातील सुभेदार रामदास पाटील यांना प्रदान करण्यात आला.
पालकमंत्र्यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण