नंदुरबार- राज्यातील पहिल्या क्रमांकाचा मतदार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात आहे. मात्र, या मतदाराचे नाव महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्याच्या मतदार यादीत असल्याने निवडणूक यंत्रणेचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
राज्यातील पहिल्या क्रमांकाचा मतदार असलेला राजेश तडवी हा अक्कलकुवा तालुक्यातील मनिबेली गावात आपल्या नातेवाईकांकडे राहत होता. काही दिवसांपूर्वी तो त्याच्या मूळ गावी गुजरात राज्यात राहण्यासाठी गेल्याने त्याचे नाव गुजरातमधील मतदार यादीत आहे आणि महाराष्ट्रातील मतदार यादीतही आहे. आपण गेल्या वीस वर्षापासून या ठिकाणी स्थायिक होतो, मात्र आता परिवारासोबत नर्मदा नदीच्या दुसऱ्या काठावर असलेल्या गुजरात राज्यातील आपल्या गावी गेल्याने आपले नाव दोन्ही मतदार यादीत आहे, असे तडवी यांनी सांगितले.